कणकवली – पिसे कामते फळसेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे अंकुश मारुती राणे कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे. त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत.यांचे आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, पिसेकामते नवनिर्वाचित सरपंच. सौ.प्राजक्ता मुद्राळे,.इब्राहिम शेख, सुभाष मालनकर, आनंद घाडी, पिसेकामते नवनिर्वाचित सदस्य संकेत राणे,रेश्मा चव्हाण,श्रावणी जाधव,सुहास कदम,नितीन मोहिते,काका कदम,कृष्णा घाडी,संदीप घाडी व पिसेकामते ग्रामस्थ.