कोंकण महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

अंबरनाथ – मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या मोर्चात घोषणाबाजी करत अपशब्द वापरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीकडून मुंबईत नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अंबरनाथ शहरातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. या मोर्चादरम्यान अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात या महिलांनी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीत आमदार किणीकर यांच्याबद्दल अपशब्द देखील वापरण्यात आले. यानंतर या घोषणाबाजीचा व्हिडिओ याच महिला कार्यकर्त्यांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसला देखील ठेवला. त्यामुळे शिंदे गटाकडून याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी ठाकरे गटाच्या महिला शहर संघटक नीता परदेशी, सिमरन शेख आणि स्नेहल कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना या गुन्ह्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment