धुळे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे थंडी जणू अचानकच गायब झाली होती. हेच तापमान पुढे चालू राहणार नसून पुढच्या दोन तीन दिवसात राज्यातील किमान तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून नुकतीच देण्यात आली होती.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात थंडी कमी झाली होती तसेच नागरिकांना उकाडा जाणवत होता मात्र, दोन दिवसा पासून थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून काल धुळे जिल्ह्यातील तापमान ७.५ अंशावर आले होते तर आज ५.५ इतक्या सर्वात नीचांकी तापमान नोद झाली आहे. हे तापमान यंदाच्या हंगामात सर्वात नीचांकी तापमान म्हणून नोंद झाली आहे. हा थंडीचा पारा यंदाच्या हंगामात सर्वाधिक नीचांकी असल्याचे हवामान खात्याकडून सांगितलं जात आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीत चांगलीच वाढ झाली आहे.
रात्रीच्या आणि पहाटेच्या कडाकेची थंडी मोठ्या प्रमाणात झाले नाही याचा परिणाम जन जीवनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, यामुळे सकाळीच मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या ही कमी झाली असून यामुळे सकाळी गर्दीने फुलणारे रस्ते सध्या निर्मनुष्य झाले आहेत.
ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्याने या वाढत्या थंडीचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार आहे. चालू असलेल्या डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यासह धुळे जिल्ह्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञनी व्यक्त केला आहे.