कोंकण

“ठाण्यात अग्नितांडव” वाहने जळून खाक

ठाणे – ठाण्यातील मुंब्रा परिसरात संतोष ग्राउंड या ठिकाणी पार्क केलेल्या ऑटो रिक्षा या तीनचाकी वाहनाला अचानक आग लागली या घटनेची माहिती मिलताच अग्निशमन दलाचे जवान, १ रेस्क्यू वाहन उपस्थित झाले. या घटनेत एक रिक्षा जळून खाक झाली असून शेजारी उभ्या केलेल्या इतर २ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही किंवा दुखापत झालेली नाही.

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील संतोष नगर येथील बॉंबे कॉलनी जवळ असलेले संतोष ग्राऊंड परिसरात उभी असलेल्या एका तीनचाकी रिक्षेला शुक्रवारी २ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास या रिक्षाला अचानक आग लागली. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मिळताच घटनास्थळी मुंब्रा अग्निशमन दल केंद्राचे पथक आणि १ रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या रिक्षाला लागलेल्या आगीला विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाने ४ वाजून ३ मिनिटांनी हि आग आटोक्यात आणली. सदर घटनेत या रिक्षेला हि आग का लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

मुबीन अहमद दळवी असे जळून खाक झालेल्या तीनचाकी रिक्षा मालकाचे नाव आहे. या घटनेत दळवी यांची MH 04 KA 8048 या रिक्षाला आग लागली होती. हळूहळू आगीचे स्वरूप रुद्र झाले आणि या आगीमुळे रिक्षेच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दोन चारचाकी गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत MH 01 AT 7068 होंडाई सेंट्रो, MH 48 F 4727 मारुती सुझुकी व्हॅगनार या दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment