कोंकण महाराष्ट्र

कोरोनाशी दोन हात करण्यास ठाणे महापालिका सज्ज

ठाणे – एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र महाराष्ट्रात तसेच ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचा पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्णसंख्या कमी आहे तरी कोरोनाचा प्रादुर्भाव जर रोखायचा असेल तर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात करायला हवी असा आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.

सध्या अमेरिका, चीन, साऊथ कोरिया आणि जपान सारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाचे लक्षणे पहिल्या करोनापेक्षा दुपटीने वाढत आहे. इतर देशांमध्ये जरी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असला तरी महाराष्ट्रात अद्याप कोरोनाचे संक्रमण कमी आहे. महाराष्ट्रात सध्या स्थितीत कोरोना रुग्ण संख्या कमी असलेले पाहायला मिळत आहे. ठाण्यात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु या सगळ्यावर दुर्लक्ष न करता नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केला आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. कोरोनाची पहिली लाट दुसरी लाट आणि तिसरी लाट भोगल्यानंतर आता कुठे तरी नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सध्या कोरोनाची भीती पहिल्यासारखी राहिली नसली तरी देखील नागरिकांनी सतर्क राहणे आहे नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले.

इतर देशांमध्ये कोरोना थैमान घालत असतानाच ठाणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास मुबलक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ठाणे महानगरपालिकेत लागणाऱ्या लस, इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन, N95 मास्क,मेडीसिन, प्रोटेक्टेड किट, पिपीई किट, सॅनिटायझर आणि बूस्टर डोसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जर कोविडने ठाण्यात शिरकाव केला तर त्याच्याशी दोन हात करण्यामध्ये महापालिका सज्ज असल्याचे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. तर दुसरीकडे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास आता घरीच कोरोंटाईन आणि इन्सुलिट करण्याचे सोय उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांचे पहिल्या लाटेमध्ये जे हाल झाले होते ते होणार नसल्याचे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment