नवी दिल्ली – चीन काही न काही कुरापती करीत असतो. मग संपूर्ण जगात कोरोना चा फैलाव करणे असो, कि नकली वस्तू बनवणे असो , चीन ची विस्तारवादीनीती संपूर्ण जगाला माहिती आहे. अशातच दिनांक ९ डिसेंबर रोजी भारत चिन प्रत्यक्ष नियंत्रण रेषे जवळ अरुणाचल प्रदेश राज्यातील तवांग येथे पीपल लिबरेशन आर्मीच्या म्हणजेच चीनच्या ३०० सैनिकांनी सीमाभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जवानांनी चीन च्या लाल आर्मी ला जशाच तसे उत्तर देऊन हा डाव हाणून पाडला. दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत काही जवान घायाळ झाले असून त्यांच्यावर गुवाहाटि येथे उपचार सुरु आहे. वेळेतच दोन्ही देशातील सैन्य अधिकारी यांनी मध्यस्ती करून मोठा अनर्थ टाळला.