महाराष्ट्र

सातासमुद्रापार परदेशी पाहुण्यांचे उजनी पाणलोट क्षेत्रात आगमन…

इंदापूर – आपल्या देशात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी थंडीच्या काळात अनेक पक्षी अन्नाच्या शोधात जलाशयाच्या ठिकाणी येतात. असेच एक ठिकाण आहे, महाराष्ट्रातील उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र. गुलाबी थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर सातासमुद्रापार करून फ्लेमिंगो पक्षांसह विविध प्रजातींचे पक्षी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, डिकसळ, भादलवाडी, डाळज, पळसदेव, गांगावळण,आगोती परिसराला लागून असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरवात केली आहे.. या परदेशी पाहुण्यांना मन भरून पर्यटकांसह छायाचित्रकार व पक्षी प्रेमी उजनी पाणलोट क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येत आहे…

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे परदेशी पक्षी प्रामुख्याने वरील ठिकाणी यायला सुरवात करतात. सुरवातीला त्यांची संख्या कमी असते. परंतु,डिसेंबरमध्ये त्यांची संख्या वाढते. जानेवारीपर्यंत येथे विणीच्या हंगामासाठी येणारे पक्षी लाखोंच्या संख्येने आढळून येतात. पावसाळा सुरू होईपर्यंत या पक्ष्यांचा येथेच मुक्काम असतो. दरम्यानच्या काळात विणीचा हंगाम उरकून नवजात पिल्लांच्या पंखात बळ आल्यानंतर हे परदेशी पाहुणे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात.

कुंभारगाव, डिकसळ, भादलवाडी, डाळज, पळसदेव, गांगावळण, आगोती या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील फुगवट्यावर रोहित, सिगल, थापट्या, शंभू बदक, ब्राह्मणी डक, स्पॉटबिल, स्पूनबिल, वारकरी, राखी बगळे व विविध प्रकारच्या पाणकावळ्यांचे आगमन झाले आहे. त्यात रोहित पक्ष्यांची संख्या 50 च्या आसपास असल्याचे येथील पक्षिनिरीक्षकांकडून सांगण्यात आले.

सध्या उजनीची पाणी पातळी मोठी असल्याने उथळ पान स्थळ ठीकने अद्याप तयार झालेली नाहीत. पाणी कमी झाल्यानंतर उथळ पाण्याचा बराचसा भाग पक्ष्यांसाठी उपलब्ध होईल. या उथळ भागातील मुबलक खाद्य मिळविण्यासाठी पक्ष्यांची सुरू असलेली धडपड कवायतीप्रमाणे दिसून येते. असे येथील अग्निपंख बर्ड वॉचर ग्रुपचे संदीप नगरे यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment