विदर्भ

प्रेमविवाहाच्या वादातून थोरल्याने धाकट्या भावाचा केला खून

अमरावती – धाकट्याने आपल्यापूर्वीच प्रेमविवाह केल्याने सामाजिक बदनामी झाल्याची भावना मनात आली. आणि त्यातूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. तो विकोपाला गेला त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन थोरल्याने धाकट्या भावाचा धारदार शस्त्राने हल्ला चढवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काजना येथे घडली. सुधीर चरणदास घरडे (२५, रा. काजना) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी सतीश उर्फ सचिन चरणदास घरडे (२७, रा. काजना) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार सुधीरने काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला. थोरला भाऊ सचिनला ते पटले नाही. त्यावरून सचिन हा धाकटा भाऊ सुधीरसोबत नेहमी वाद घालत असायचा. याच कारणावरून दोघा भावांमध्ये घरासमोरच वाद झाला. या वादात सचिनने सुधीरवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. सुधीर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.

त्यानंतर सचिन घटना स्थलवरून पसार झाला. हा प्रकार सुधीरची पत्नी कशीश (१९) हिच्या धयनात आल्यावर त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने सुधीर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुधीर यांना मृत घोषित केले. त्याच्या पोटात दोन वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आरोपीच्या शोधात पोलिसांनी दोन पथक रवाना केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment