पश्चिम महाराष्ट्र

११ महिने रखडलेली जिल्हा नियोजन समितीची सभा होणार

कोल्हापूर – राज्यात झालेले सत्तांतर, त्यानंतरचे बदलेले मंत्री मंडळ, बदलेले पालक मंत्री. जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न आणि समस्या, या पार्श्वभूमीवर तब्बल ११ महिने रखडलेली जिल्हा नियोजन समितीची सभा आता शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२  रोजी दुपारी २ वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

प्र. जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव संजय शिंदे दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दि. १० जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च २०२२ अखेरच्या खर्चास मान्यता देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२१-२२  कोविड-१९ च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ माहे नोव्हेंबर २०२२ अखेरील खर्चाचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ मधील पुनर्विनियोजनास मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२३- २४ च्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी या सभेस विहित वेळेत उपस्थित रहावे, असेही शिंदे यांनी कळविले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment