मुंबई

सरकारी नोकर होण्याची स्वप्न होणार पूर्ण

मुंबई :- प्रत्येक सुशिक्षित तरुणांना वाटते की आपल्याला सरकारी नोकरी असायला हवी. प्रत्येक आईवडिलांना वाटत कि आपली मुल सरकारी नोकरीवर असायला पाहिजे आणि आपली मुलगी ज्या घरी जाईल तो जावई सुद्धा सरकारी नोकरदार असावा. अशी मुलीकडील मंडळींची इच्छा असते. परंतु गेल्या सात ते आठ वर्षा पासून समाजामध्ये असे चित्र दिसते आहे कि शासनाने आजपर्यंत नोकरभरती केली नसून सर्व तरुण, पालक याचे स्वप्न कुठेतरी कोमेजले होते. परंतु आपल्या भारत देशाला १५ आगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली असून शासन संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करीत आहे येत्या काळात लवकरच राज्यभर विविध विभागामध्ये ७५००० नोकर भरती केली जाईल असे आदेश शासनाने काढले आहे. लवकरच राज्यातील विविध विभागामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार असून महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने संपूर्ण राज्यामध्ये पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून पद भरती करिता अर्ज स्वीकारणे प्रक्रिया राबविली जात आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment