BY: सुनीता झाडे, नागपूर
कोरोना काळातील प्रत्यक्ष आरोग्यावरील परिणामंपेक्षा समाजिक आरोग्यावरील परिणाम गंभिररित्या समोरे येत आहे. ज्यावर कुठल्याही रुग्णालयात इलाज नाही. आणि रुग्णालयाबाहेरही इलाज नाही ते विमनस्क ्मनस्थितीत रस्त्या रस्त्यात, घराघरात दिसत्तील. यात जवळचा माणूस गेलेले, जवळची नोकरी गेलेले, आवक नसल्याने स्थैर्य गमावलेले, जावक नसल्याने सौख्य गमावलेले वाटा गणिक आहेत.
व्यवस्थेत यांची कुठेच जवाबदारी नाही. कुठेच टिकाव नाही. समाजनितीत सबसे बडा रुपया असल्याने रुपयाच्या मुल्यात कमी पडलेले हे लोक जगभरात अस्ताव्यस्त आहे. अर्थात त्यांच्या अस्वस्थतेच मुलभूत कारण जवळ पैसा नसणे, कारण काम नसणे. त्यात करोनानंतरच्या अनियंत्रित महागाईने अश्या लोकांना निष्ठूरतेच्या गर्तेत लोट्ले आहे. आणि बेकार निष्ठूरता गुन्हे घडवून आणत आहे. जगभरात गुन्हेगारीचे अती अतिरेकी स्वरुपात समोर येत आहे. यात सायबर क्राईम विशेषत्त्वाने वाढत आहे.
एका राष्ट्रीय सर्वेक्षणाने सायबर क्राईमच्या संख्येतील ही वाढ निर्देशनास आणून दिलेली आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने अगदीच बेमालूमपणे लोकांना ट्रॅप करने वाढलेले आहे की सायबर सेलसमोरही आव्हान होऊन बसले आहे. ज्याप्रमाण गुन्हे घडत असल्याच्या बातम्या समोर येतात त्या तुलनेत गुन्हेगार सापडल्याचे प्रमाण कमी आहे.
खालील नागपुर येथील सोशल मिडीयावरील अनुभव हे एकाच दिवशी ऑनलाईन आलेले आहे. या अनुषंगाने चर्चेत आलेले ऑफलाईन अनुभव चौपट आहेत.
रश्मी लिहते, तुम्ही आॅनलाईन केलेल्या व्यवहारांवरून, एखाद्या पसाठी, लोनसाठी, खरेदीसाठी, बॅंक अकाऊंटसाठी किंवा कशाहीसाठी दिलेल्या माहितीवरून तुमची इथंभूत माहिती काढून त्या माहितीसह, तुमच्या फोटोसह एक अत्यंत वाईट-भयावह मॅसेज तुमच्यासह, तुमच्या नातेवाईकांना निकटवर्तीयांना व्हॉट्सएप्व्दारा पाठवला जातो.
(ज्यात तुमच्या विषयी काहिही लिहल्या जाऊ शकते.) त्यानंतर त्या व्यक्तिचा मॅसेज येतो की आता चारच लोकांना मॅसेज केलाय इतरांना करायला नको असेल तर 50000 हजार रुपये द्या….
म्हणजे उघड उघड ब्लॅकमेल केलं जातं. काही कारवई करावी तर शोधुनही यांचा नावगावपत्ता सापडत नाही. वारंवार मैसेज केला तर उत्तर मिळत नाही. फोन केला तर उचलल्या जात नाही. अखेर एक व्हॉईस मॅसेज येतो, “ज्यादा फोन मत कर तेरे जैसे बहोत कस्टमर है मेरे पास…” हे ऎकूण भांबावलेच.
आम्हाला ज्या नंबरवरून हे मॅसेज आलेत तो TrueCaller वर असा दाखवतो आहे. आम्ही सायबरला आणि पोलिस तक्रार केली आहे. तरी त्याचा कुठूनच काही पत्ता लागत नाही आहे. आमच्या नावाचे कुणाला मॅसेज आले तरी आणि तुम्ही स्वतःच्या बाबतीत देखील जागृत राहावे यासाठी हा मॅसेज देत आहे.
देवेंद्र लिहतो, एका ७ आकडी नंबरवरून मला नेहमी मिस कॉल येतो. कोणीही उचलत नाही. ब्लॉक ही होत नाही. काय करावे कळ्त नाही.
संतोष लिहतो, दोन दिवसांपूर्वी रात्री दीड वाजता मी बेडवर झोपणार तोच उशाशी असलेला मोबाईल आपोआप सुरु झाला. मी त्याकडे बघतच होतो सेटिंगमधील एक एक फ़ंक्शन सुरू होत होतं. त्यानंतर कि बोर्ड उघडल्या गेले आणि काही टाईप सुद्धा व्हायला लागले. मी लगेच मोबाईल हाती घेतला आणि टाईप झालेले सर्व मॅटर कट केले. मॅटर कट केल्यावर ते सारे थांबले ही गंभीर बाब आहे. तुम्ही सतर्क रहावे म्हणून सांगत आहे.
भारती लिहते, मला युरोपातील एका व्यक्तिची फ़्रेंड रिक्वेस्ट आली. मी ती स्विकारली. तो इनबॉक्स मधे बोलू लागला. मी ही बोलायला लागले. पुढे नंबरची देवाण घेवाण झाली. दररोज बोलू लागलो. तो माझ्याकडून माझी सगळी आर्थिक माहिती काढत होता.
मी ही बेमालूपणे त्याला पुरवित होते. तिकडन देण्याघेण्याच ठरत होत. माझ्या जवळचया मैत्रिणीच्या हे लक्षात आलं तिने मला माझी फसवणूक होत असल्याच सांगीतलं आणि मी थांबले. मी जशी सावरायला लागले तसे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने मला एंटरटेन केले नाही.
किरण सांगतो, मला रात्री मैसेंजरवर कॉल येतो. मी घेतो. त्यात काही कळायच्य आत एक मुलगी कपडे काढते. कही सेंकदात कॉल कटतो. मला एक फोटो पाठवला जातो ज्यात ती मुलगी विवस्त्र आहे आणि मी तिला पहात आहे. त्यानंतर मैसेज करुन मला पैश्याची मागणी केली जाते. ्न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्या जाते. मित्रांकडून घाबरुन पैसे दिल्या जात असल्याचे कळले. मी सायबर सेलला तक्रार केली. पुढे काय झाले कळले नाही.
सारीकाने तिच्या मैत्रिणीचा अनुभव शेअर केला. माझ्या एका मैत्रिणीचे इंस्टाग्रामवर अकाऊंट आहे. तिथे तिला एक जर्मन मुलगा भेटला. त्यावेळेस जगभरात लॉकडाऊन सुरु होतं, काही घरुन काम करीत होते. काहींचे काम सुटलेले होते. ही घरी राहून काम करीत होती. चांगल्या कंपनीत चांगल्या पगारावर होती. तो तिला नोकरी सुट्ल्याचे सांगत होता. भावनीक जवळीक करीत होता. हळूहळू याला-त्याला छोटी- छोटी रक्कम मागायला सुरवात केली.
मग परत बोलण तिला भावनिकरित्या आपल्यात गुंतवण परत पैसे मागण अस सुरु ठेवलं. या दिवसात ती त्याच्यात फुल्ल बिझी होती. आपण काय करतोय हे तिला कळतच नव्हतं. एकल पालक होती. मुलगा मुंबईत नोकरीला होता. कोणी विचारणार, सांगणारं नव्ह्तं. मग कधीतरी, कुठेतरी, काहीतरी तिला फसवणूक होत असल्याच जाणवलं व ती थांबली. अजुनही आर्थिक, भावनीकरित्या फसवल्या गेल्याची सल आहे तिच्या मनात.
यासोबतच बँक, विमा कंपनी, फॉरेनवरून आलेली भेटवस्तू आणि लॉटरीच्या नावाखाली फसवणूक केली जाते. अजनीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला एटीएम कार्ड बंद पडल्याच्या नावाखाली साडेसहा लाखांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. “अमूक बँकेतून बोलतोय..तुमच्या एटीएमची सेवा समाप्त झाली आहे… कृपया एटीएम पासवर्ड सांगा…’
अशा प्रकारचा संवाद साधून जेष्ठ नागरिकांची फसवणूक केल्या जात आहे. बँकेतून फोन असल्यामुळे विश्वासाने वृद्ध साहजिकच सर्व माहिती सांगतात. तेथेच त्यांची फसवणूक होते. हा गंडा घालण्याचाही नवा ट्रेंड असल्याचे सायबर क्राईम तज्ञ सांगतात. तसेच विमा पॉलिसीच्या नावाखाली वृद्धांना गुंतवणूकीच्या दुप्पट पैसा देण्याची स्किम सांगतात.
अशा आमिषांना वृद्ध बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. यासोबतच अनेक जेष्ठ नागरिकांना फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवरही मुलींच्या नावाचा प्रोफाईल ठेवून आर्थिक लुबाडणूक करतात. राज्यभरात वृद्धांच्या ऑनलाईन फसवणूकीच्या 20 टक्के घटनांची नोंद आहे.
- यासर्व घटनांबाबत सायबर तज्ञ तौफ़िक आजाद यांच्याशी संपर्क साधला असता ते पुढिल खबरदारी घ्यायला सांगतात. सोबतच प्रतिबंधात्मक उपाय सुचवतात.
- सर्वप्रथम कुठलेही आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका.
- अनोळखी संकेतस्थळांना भेटी देण्याचे टाळा.
- चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
- संगणक वापरताना जागरूक राहा. अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका.
- स्पायवेअर व वायरस यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटी व्हायरस आणि अँटी स्पायवेअर प्रोग्रॅम बसवून घ्या.
- दर दोन किंवा तीन दिवसांनी संगणकाच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
- पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.
- तुम्ही एखाद्याचे नक्कल करणारे बनावट आयडी बनवून त्या व्यक्तीचे नक्कल करणारे किंवा आक्षेपार्ह पोस्ट सतत टाकले व मूळ व्यक्तीने सायबर विभागाकडे तक्रार केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून अशा बाबी आपण कटाक्षाने टाळाव्यात.
- व्हाट्सअँपने आपला फोन नंबर फेसबुकसोबत जोडण्याचा पर्याय दिला आहे पण द्यावा कि नाही हा तुमचा प्रश्न असला तरी इथे असुरक्षित आहे.
- डेबीट/क्रेडीट कार्डच्या फोटोकॉपीची प्रत द्यावयाची असेल अशा वेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या.
- डेबीट/क्रेडीट कार्ड व अकाऊंटचा तपशील देऊ नका.
- ज्या वेबसाईटच्या माध्यमातून पेमेंट करावयाचे आहे, तिची सुरक्षाव्यवस्था तपासा.
- फोन क्रेडीट/ डेबीट कार्ड व ई-बॅकिंगची माहिती देऊ नका.
- डेबीट/ क्रेडीट कार्ड गहाळ झाल्यास ते रद्द करण्यासाठी तात्काळ अर्ज करा व संबंधित संस्थेला त्याची माहिती द्या.
- अनोळ्खी लोकांबरोबर चॅट करु नका व विश्वास ठेवू नका.
- काही ई-मेल अनोळ्खी व्यक्ती अथवा संस्थाकडून येतात. त्या काळजीपूर्वक वाचा. ऍटचमेंटबरोबर व्हायरस येऊ शकतो.
- अशा ई-मेल माहितीची विचारणा करतात. तेव्हा महत्त्वाची गोपनीय माहिती, पासवर्ड, फोन नंबर देऊ नका.
- अश्लील ई-मेल बघू नका, येणाऱ्या लिंकवर क्लिक अजिबात करू नका, दुर्लक्ष करा.
- नियमितपणे ई-मेल,फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्रामच्या अकाऊंटचा पासवर्ड बदला.
- वायरलेस इंटरनेट राऊटर खिडकी किंवा दरवाज्याजवळ नको.त्याची योग्य जागा म्हणजे हॉलच्या मध्यावर असावी.
- रेंज निवडताना, इमारत व परिसराचा योग्य विचार करावा. यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्याअ निम्या क्षेत्रापर्यतच इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल अशी रेंज असावी म्हणजे बेकायशीर वापर करता येणार नाही.
- इंटरनेट वापरात नसेल तर बंद करावे.
- फक्त सुयोग्य व्यक्ती व ऍथोराईजड लॅपटॉपचा वापर होत आहे की नाही हे नेहमी तपासून पहावे.
- महत्त्वाच्या फाईल्स, फोल्डर्स व गोपनीय माहिती ही फक्त ऍक्सेस असणा-यांना वापरुन देतात. यामध्ये इतर कोणी बेकायदेशीर उपयोग करत नाही यावर लक्ष ठेवावे लागते.
- लॉग डाटा म्हणजे कोणी कोणता संगणक वापरुन इंटरनेट अथवा इन्ट्रानेटचा वापर केला याची नोंद हा लॉग डाटा दररोजच्या दररोज हार्डडिस्कवर बॅक घ्यावा.
- संगणकामधील महत्त्वाचे माहिती नष्ट किंवा खराब करण्यासाठी व्हायरस उपयोग करतात. या पासून सुरक्षा म्हणून चांगल्या प्रतीचे व सतत अपडेट करता येईल असे ऍन्टी व्हायरस प्रोग्राम संगणकावर नेहमीच लोड करावे.
- महत्त्वाच्या डाटाचा बॅकअप संगणकामधील हार्डडिस्कवर ठेवावा तसेच सी.डी. रॉमवरही ठेवावा.
- संगणक व नेटवर्कचा ऍडमिनिस्टरचा पासवर्ड कोणालाही देऊ नये व तो सतत बदलत रहावा.
- इंटरनेट वापरातून व्हायरस येण्याची शक्यता असते अशा वेळी काळजी घ्यावी. Antiviras चा वापर करावा.
- दुस-या संगणकाकडून पेन ड्राईव्ह अथवा स्टोरेज उपकरणातून वापरावयाच्या फाइलचे व्हायरस स्कॅनिंग करुन मगच वापराव्यात.
- फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्रामवर वावरत विशेषतः चॅटिंग करताना गोपनीय माहिती उघड करू नका हि बाब अंगलट येऊ शकते!
ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी
– अनोळखी फोनला प्रतिसाद देऊ नये.
– अनोळखी ई-मेल्स, फेसबुक फ्रेंड्स रिक्वेस्ट स्विकारू नका.
– एटीएमचा पासवर्ड कुणालाही सांगू नका.
– पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करू नका.
– एटीएममधून पैसे काढताना कुणाची मदत घेऊ नका.
– बँकेतून फोन असल्याचे सांगितल्यास फोन कट करावा.
– एटीएम बंद पडल्याचे सांगितल्यास बँकेत स्वतः जाऊन चौकशी करण्याचे सांगावे.
– विमा काढाचा सल्ला दिल्यास थेट नकार द्यावा.
– लाखोंची लॉटरी लागल्याचा फोन आल्यास विश्वास ठेवू नका.
पासवर्ड लक्षात राहत नाही. तसेच दृष्टी योग्य नसते. त्यासाठी कुणाची मदत
घ्यावी लागते. ऑनलाईन व्यवहार करणे धोक्याचे आहे. जेष्ठ नागरिक सॉफ्ट
टार्गेट असल्याने वृद्ध लुटल्या जातात. त्यामुळे फोन आल्यास बोलूच नव्हे
किंवा फोन कट करावा. आर्थिक व्यवहार करताना सावध रहावे.