विज्ञान

ममीत रूपांतर केलेले उंदीर, फाल्कन पक्षी आणि बरंच काही शास्त्रज्ञांना सापडले

इजिप्तच्या सोहाग शहरात एक मकबरा नुकताच सापडला आहे. त्याला नुकतंच सजवण्यात आलं आहे. तिथे अनेक वस्तू सापडल्या असून तिथे उंदराचं ममीत रूपांतर केल्याचंही दिसत आहे. उंदीर आणि इतर प्राण्यांच्या सभोवताली दोन मानवी प्राण्यांच्या मृतदेहाचंही ममीत रूपांतर करण्यात आलं आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या जागी मानवी प्राण्यांच्या अंत्यसंस्काराचे अनेक चित्र आहेत. तसंच शेतात कामं करणाऱ्या अनेक लोकांची चित्रं आहेत. तज्ज्ञांच्या मते हा मकबरा 2000 वर्षं प्राचीन आहे. टुटू नावाचे एक ज्येष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची ही विश्रांती घेण्याची ही जागा होती, असंही तज्ज्ञ सांगतात. ऑक्टोबरमध्ये काही दरोडेखोरांनी तिथे दरोडा घातला तेव्हा या जागेचा शोध लागला.

ही जागा राजधानी कैरोपासून 390 किमी दूर आहे. हा भाग वाळवंटी असला तरी या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतील, अशी आशा इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाला आहे. इजिप्तच्या Supreme Council of Antiquitiesचे सचिव मुस्तफा वाझिरी सांगतात, “हा अतिशय सुंदर मकबरा आहे. गेल्या काही वर्षातला हा सर्वोत्तम उत्तम शोध आहे. 2011च्या उठावानंतर देशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झाला हे. या मकबऱ्यामुळे पर्यटक परत येतील अशी त्यांना आशा आहे.” टॉलमिक काळातील एक महिला आणि एका पुरुषाची ममी मकबऱ्याच्या बाहेर मांडण्यात आली आहे. मृत्यूसमयी या महिलेचं वय 35 ते 50 होतं तर मुलाचं वय 12 ते 14 होतं.

About the author

admin

Leave a Reply

Leave a Comment