रत्नागिरी – एका खाजगी ट्रॅव्हल्सने युवती एकटीनेच प्रवास करत होती यावेळी त्या मुलीची छेड काढणाऱ्या दोन संशयित युवकांना दापोली तालुक्यातील वेळवी कादिवली परिसरातील ग्रामस्थांनी त्या दोघांचे थेट मुंडन करून अद्दल घडवली आहे. विरार ते दोन साकुर्डे मार्गे विरार मुंबई अशी चालणारी खाजगी ट्रॅव्हल्स मधून ही युवती एकटीच प्रवास करत होती. या गाडीत उपस्थित असलेल्या संशयित ड्रायव्हरने त्या मुलीची छेड काढली. त्या मुलीचा विनयभंग केल्याने ग्रामस्थांनी त्या ड्रायव्हरला व अन्य एक संशयिताला ताब्यात घेऊन ग्रामस्थांनी मुंडन करून त्यांना चांगली शिक्षा दिली आहे हा संशयित रायगड जिल्हयातील महाड दासगाव येथील राहणार आहे मात्र या प्रकरणाची दापोली पोलीस स्थानकात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. यावेळी एका बसमालकाच्या संशयित मुलाचेही मुंडन करण्यात आले.