कोल्हापूर – उद्योग केवळ फायद्यासाठी नाही तर समाजासाठी असावा अशी संकल्पना पुढे आली असून सरकारचे काम व्यावसायिक होणे नसून व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हेच असायला हवे. सरकार जेव्हा अडचणीच्या काळात उद्योग व्यवसायांच्या सुरक्षेची हमी घेते तेव्हाच व्यापार वृध्दी होते. तरच उभारलेले उद्धोग सामाजाच्या उपयोगाचे ठरतील. असे प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी केले. ते शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) च्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील हे होते.
यावेळी डॉ. थोरात भारतातील यांनी गेल्या १७० वर्षाचा उद्योग व्यवसायाचा आढावा घेऊन १९१९ साली परदेशी चलनाच्या तुटवड्याचे आव्हान त्याकाळी कसे पेलले हे विस्ताराने सांगताना तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंह , नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंह अहलुवालिया यांच्यामुळे ते शक्य झाल्याचे स्पष्ट केले. आताही साधारण तीच स्तिथी देशापुढे असल्याचे सांगून त्यांनी ऊर्जा, कच्चा माल आणि शेती या तीन क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी. सन २००० नंतर इंटरनेट आणि तंत्रज्ञान उत्पादन प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनला आहे. याचा प्रभावी वापर वस्तू आणि सेवा क्षेत्रात व्हायला हवा असे सांगितले.
या कार्यक्रमांत सचिन मेनन, आर. बी. वारणूळकर, शिरीष सप्रे, जेठाभाई पटेल, भगवान पवार, मंगेश हराळे, संजय भगत, अमर जाधव यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्मॅकचे जेष्ठ संचालक सुरेन्द्र जैन, स्मॅक उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, स्मॅक फाऊंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नीरज झंवर, स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, भरत जाधव, सोहन शिरगांवकर, रवी डोली, उद्योजक सचिन मेनन, सचिन शिरगांवकर, दिपक जाधव, हरिषचंद्र धोत्रे, चंद्रशेखर डोली, रवी डोली, सचिन पाटील, जयदीप चौगुले, प्रशांत शेळके, अमर जाधव, जयदत्त जोशीलकर, अतुल पाटील, नामदेव पाटील, भीमराव खाडे, आदी उपस्थित होते. स्मॅकचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी स्वागत केल. उपाध्यक्ष एम. वाय. पाटील यांनी आभार मानले.