साहित्य

‘या’ चित्रपटाने मिळवली होती डॉ. बासाहेब आंबेडकरांची प्रशंसा

20 जानेवारी 1955 च्या पत्राने दिली ग्वाही

By दमयंती पाटील पुणे.

आजकाल चित्रपट त्याच्या कलाकृती पेक्षा त्यातील कलाकार कोण, कोणत्या विषयावर, कोणासोबत काम करतो या विषयीच्या वादंगानेच अधिक चर्चेत येत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याची सर्वाधिक आठवण होते ती अशा वेळीच.

पण आपल्याला माहिती आहे का? मराठी चित्रपट सृष्टीतील असा एक चित्रपट होता ज्याची खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रशंसा केली होती. तो चित्रपट होता 1954 ला प्रदर्शित झालेला महात्मा फुले. एकोणिसाव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. आचार्य अत्रे यांची पटकथा असलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट.

त्यावर्षीचे सर्वोकृष्ट फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. बाबूराव पेंढारकर, बापूराव माने, दामूअण्णा जोशी, सरस्वती बोडस, अमर शेख, केशवराव ठाकरे यांनी यात कलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवर्जून हा चित्रपट पाहिला. आणि पत्र पाठवून आचार्य अत्रे यांना आपला अभिप्राय कळविला होता. चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा ही दिल्या होत्या. ता. 20 जानेवारी 1955ला लिहीलेले हे पत्र समाज माध्यमातून पुढे आले आहे.

कोणी, कोणासोबत, कोणते काम केले, कसे करावे हा जरी व्यक्ती स्वांतत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असला तरी आपले विचार, आपल्या निष्ठा आपल्या व्यक्तीमत्वाचा भाग असतात. आणि आपले व्यक्तिमत्व कृतीतून पुढे येत असते. हेच हे पत्र सुचित करते. नाही का?

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment