महाराष्ट्र मुंबई

स्कुल बसचा चालक दारू पिऊन ४० विद्यार्थ्यांच्या जीव वाचला

नवी मुंबई – उलवे मधील इंडियन मोडल स्कुल शाळेच्या बसचा चालक फुल्ल टू दारू पिऊन शाळेचे ४० विद्यार्थी घेऊन शाळेच्या दिशेने सुसाट रवाना होत होता. मात्र दारूच्या नशेत टराट असलेल्या ह्या ड्रायव्हर ने रस्त्यावरून प्रवास करत असताना उलवे सेक्टर २१ येथील आरामुस बिल्डिंगच्या जवळ शाळेच्या बसचालकाने रिक्षाला धडक मारल्याची धक्कादायक घटना सकाळी ८ च्या सुमारास घडली.

यावेळी ड्रायव्हर अशोक थोरात वय ६५ वर्ष असलेले चालक व ४० विद्यार्थी या बस मधून शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. उलवे नोड मधील ह्या घडलेल्या घटनेतून उघडकीस आले आहे की बस चालकाचा हा निर्दियपणा ४० विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असता. मात्र या मध्ये कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसून बसचालकांचा हा बेधुंदपणा पालकांची झोप उडविणारा आहे.

उलवे मधील इंडियन मोडल स्कुलच्या बस मधून सकाळी आठ च्या सुमारास ४० विद्यार्थी शाळेत जात होते. मात्र शाळेच्या बसच्या चालक हा दारू पिऊन फुल टू अवस्थेमध्ये ४० विद्यार्थ्यांना पिकप करून बस रस्त्याने सुसाट चालवत होता. मात्र मध्येच समोरून रिक्षा आल्याने हा दारू पिऊन फुल टू असलेल्या बसचालकाने रिक्षाला जोरदार धडक दिली.

उलवे सेक्टर २१मधील आजूबाजूच्या परिसरातील व्यक्तींनी ही घटना पाहताक्षणी धाव घेतली. तर ड्रायव्हर दारू पिऊन बस चालवत असलेले नागरिकांच्या निदर्शनास आले. या संबंधित इंडियन मोडल स्कुलच्या प्राचार्य वृषाली पराडकर याच्या निदर्शनास आणून दिले असता ह्या ड्रायवरला कामावरून काढून टाकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच ४० विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेल्या ह्या घटनेविषयी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपी अशोक थोरात वय ६५ वर्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून Ipc कलम २८९, Ipc कलम ३३६ मोटार वाहन अधिनियम s / कलम १८४ आणि कलम १८५ अंतर्गरत आरोपीस जेरबंद केले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment