खान्देश

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीतून घेतले भरघोस उत्पन्न

धुळे – विद्यार्थ्यांनी नोकरी न मागता नोकरी देणारे तयार झाले पाहिजेत असा सूर शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नेहमीच येत असतो. मात्र विद्यार्थ्यांना पुस्तके शिक्षणासोबत व्यवहारिक शिक्षण देण्याची देखील गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. हीच गरज ओळखून धुळे शहरातील आदर्श शिक्षण संस्था संचलित आश्रम शाळेने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीतून फळभाज्या आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले असून यातून येणारा नफा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच वापरला जातो पाहूया विद्यार्थ्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीचा हा अनोखा प्रयोग.

आपण पहात असलेली ही दृश्य कुठलीही बालमजुरीची किंवा शेतात काम करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांची नसून ही दृश्य आहे धुळे शहरातील आदर्श शिक्षण संस्था संचलित आश्रम शाळेतील सेंद्रिय शेती करणाऱ्या विद्यार्थ्यांची धुळ्यातील आदर्श शिक्षण संस्था संचलित आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो यातूनच शाळेच्या परिसरात असलेल्या जागेचा वापर करून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे तंत्रज्ञान शिकविण्यात आले यातून विद्यार्थ्यांनी फळभाज्या आणि पालेभाज्यांची उत्पादन घेतले आहे.

या भाज्यांच्या विक्रीतून येणारा नफा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच खर्च केला जातो, विशेष म्हणजे कृषी क्षेत्रा संबंधित कुठलेही शिक्षण न घेतलेले हे विद्यार्थी जमिनीच्या मशागती पासून तर भाज्यांच्या उत्पादनापर्यंत सगळी कामे स्वतः करतात. ही शेती करण्यासाठी लागणारा थोडा आर्थिक भार संस्थेचे संचालक उचलतात. त्यातून शेतीसाठी लागणारी विविध साहित्य खरेदी केली जातात. विद्यार्थ्यांनी या सेंद्रिय शेतीतून फुलकोबी, मिरची, टोमॅटो, टमाटे मिरच्या, दुधी भोपळा, वांगे या भाज्या पिकवले आहेत.

बाजारभावापेक्षा दीडपट जास्त भावाने या भाज्यांची विक्री केली जाते. विशेष म्हणजे तालुक्यातील विविध गावातून या भाज्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सेंद्रिय शेती सोबतच विद्यार्थ्यांचं ज्ञानदेखील वाढीस लागला असून यातून विद्यार्थ्यांना रोजगार देखील मिळत आहे. वर्षभरात विद्यार्थी असे विविध उपक्रम राबवून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून त्यांचे शैक्षणिक खर्च केले जातात…

आश्रम शाळेत शिकणारी मुले ही जिल्ह्यातील विविध गावातून आलेले आहेत यामुळे या विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केले जातात, यातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे कौशल्य विकसित होत असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापकांनी व्यक्त केली….

आजचा विद्यार्थी हा भविष्यात नोकरी मागणार नाही तर नोकरी देणार तयार झाला पाहिजे ही काळाची गरज ओळखून आदर्श शिक्षण संस्था संचलित आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल ठरवेल यात शंका नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment