विदर्भ

चंद्रपूरात भूकंपाचे धक्के….! काय म्हणाले अभ्यासक

चंद्रपूर – शहराचा बाबुपेठ परिसरात रविवारला रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्के जानविल्याची अफवा पसरली. मात्र हे धक्के भूकंपाचे नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरात धक्के जाणविले. या परिसरात खुल्या आही भूमिगत कोळसा खानी आहेत.या खाणीत स्पोट केला असावा किंवा भूखलनाची घटना घडली असावी, त्यामुळ हे धक्के जाणवले, अशी शक्यता अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी वर्तविली आहे.

रविवारचा रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ, लालपेठ आणि नांदगावपेठ या परिसरात धक्के जाणविले होते. त्यामुळ या परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे धक्के भूकंपाचे होते काय ? याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. हा धक्का एक मॅग्नेट्यूड पेक्षा जास्त क्षमतेचा दर्शविलेला होता. तो जमिनीपासून दहा किलोमीटरच्या खोलीत घडून आला, असे काहींनी म्हटलं. या परिसरात यापूर्वीही असे धक्के जाणवल्या गेले आहेत. कोळसा खाणीत ब्लास्ट केल्या जात. या ब्लास्ट मुळ अनेक घरांना तडे गेलेले आहेत. घुगुस येतील अख्ख घर जमिनीत गेल होत. या घटनेला भूमिगत खानी जबाबदार असल्याचही त्यावेळी बोललं गेलं. भूमिगत कोळसा खाणीत कोळशाचा उपसा केल्यानंतर तिथं रेती भरणं गरजेचं होतं. मात्र रेती भरण्याकडे वेकोलीच दुर्लक्ष झाल. आणि घुगुसची घटना घडली. अशा घटना यापुढेही होऊ शकतात. यासाठी प्रशासनानं कोळसा खाणी संदर्भात ठोस धरण फुलंबने आता गरजेचे झाले आहे, असे आता बोलले जात आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment