अमरावती – हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस ढगाळ वातावरण व त्यानंतर थंडीची लाट हा अंदाज खरा ठरत आज सकाळच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या पावसाने कुठे शेतकऱ्यांची चिंता वाढवली तर कुठे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
अमरावती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये तुरळक किंवा एक ते दोन ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आकाश ढगाळ राहील. याच अंदाजानुसार आज सकाळी पावसाने हजेरी लावली. वेळेवर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कुठे दिलासा मिळाला आहे तर कुठे फटका बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.
सध्या संत्रा पीक हे तळणवर आहे. तूर कापणीचा हंगाम सध्या जिल्ह्यात सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी आपली दूर कापून मशीनद्वारे काढण्यासाठी गंज लावून ठेवली होती मात्र आज सकाळी आलेल्या पावसामुळे तुरीची गंजी अनेक ठिकाणी मुली झाली आहे त्यामुळे तुरीमध्ये मॉइश्चर चे प्रमाण वाढल्याने तुरीची प्रतवारी खालून भाव कमी मिळण्याची चिंता शेतकऱ्यांना स्वतः होत आहेत.
अशातच जिल्ह्यात बहुतांश भागात हरभरा आणि कांद्याची लागवड सुरू आहे अनेक ठिकाणी हरभरा हा गाठ्यांवर आला आहे कांदा व हरभरा पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे तर अनेक भागात अजूनही गव्हाच्या प्रेरणा सुरू आहे कालपर्यंत झालेल्या पेरण्या वर हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांचा वेळ गव्हाला पाणी देण्याचा वेळ वाचला आहे तर आज पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर जात नसल्याने गव्हाच्या पेरण्या लांबण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे आज आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठे आनंद तर कुठे चिंतेचे ढग पसरल्याचे दिसून आले.