मनोरंजन

हा कलाकार दिसणार शंकर महाराजांच्या रूपात

गेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावर धार्मिक महापुरुषांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या महापुरुषांचा जीवनपट या मालिकांमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. सासु सुनांची भांडण .. किचन पॉलिटिक्स यासारख्या मालिकांच्या गर्दीत प्रेक्षकांकडून देव देवतांच्या कथा व लोकांच श्रद्धास्थान असलेल्या कथानकावर बेतलेल्या मालिकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रवाहात छोट्या पडद्यावर सादर होत असलेल्या योग योगेश्वर जय शंकर या मालिकेलाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. मालिका सुरू झाल्यापासून योग योगेश्वर जय शंकर यांच्या बालपणातील अद्भुत लीला प्रेक्षकांनी पाहिल्या. आता ही मालिका लीप घेणार असून अर्थातच योगयोगेश्वर जय शंकर हे मोठे झालेले प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आता मोठ्या झालेल्या योग योगेश्वर जय शंकर यांच्या रूपात कोणता अभिनेता पडद्यावर दिसणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता या रूपात अभिनेता संग्राम समेळ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संग्राम ला या रूपात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘योग योगेश्वर जय शंकर’ प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. अल्पवधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही मालिका शंकर महाराजांच्या लीलांवर आधारलेली आहे. त्यांचं कार्य जनमानसात पोहोचवण्याचं काम ही मालिका करत आहे. या मालिकेतील बालकलाकार देखील आता घराघरात लोकप्रिय झाला आहे. मालिकेत बालकलाकार आरुष बेडेकर मुख्य भूमिकेत दिसत आहे. तो मालिकेत बालपणीच्या शंकर महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र आता मालिका पुढे सरकणार आहे. शंकर महाराजांच्या बाललीला दाखवल्यानंतर आता त्यांच्या साधनेची वेळ जवळ आली आहे. त्यामुळेच मालिका आता काही वर्षांची लीप घेणार आहे. मालिकेत आता मोठे शंकर महाराज दिसणार आहेत.

मालिकेतील छोटा शंकर हा अंधश्रद्धा सोडून खऱ्या भक्तीचं महत्व पटवून देत आहे. मात्र आता मालिकेतील शंकर मोठा होणार आहे. लवकरच मोठे शंकर महाराज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात बालशंकर दत्तगुरूंच्या आदेशावरून एका गुहेत ध्यानासाठी जाताना दाखवण्यात आला आहे. तो अनेक वर्ष या गुहेत साधना करणार आहे आणि मोठा होऊन जनमानसात परत येणार आहे. मालिकेत मोठ्या शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळ साकारणार आहे. संग्राम यापूर्वी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजेंच्या भूमिकेत दिसला होता.

यासोबतच तो ‘स्वीटी सातारकर’, ‘विक्की वेलिंगकर’ यांसारख्या चित्रपटात दिसला आहे. सोबतच त्याचं ‘एकच प्याला’ हे नाटकंही फार गाजलं होतं. या पूर्वी तो बाप माणूस या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता तसेच ‘ललित २०५’ या मालिकेत संग्राम ने नायकाची भूमिका साकारली होती. संग्रामचा ‘साथ सोबत’ हा चित्रपट येत्या १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तर प्रेक्षक त्याला शंकर महाराजांच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तर संग्रामही त्याच्या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment