अमरावती – मागील वर्षी याच महिन्यात सोयाबीनचे दर ७००० पर्यंत जाऊन पोहोचले असताना आता गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने सोयाबीन दर अधिकाधिक कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या दरवाढीची आशा असून अमरावती जिल्हासह राज्यातील हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याने सोयाबीन घरी ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. सोयाबीनची पेरणी,काढणी करेपर्यंत शेतकऱ्यांनी हजारो रुपये आपल्या पिकांवर खर्च केली.त्यामध्ये महागडे बी बियाणे ,औषधे,फवारणी,खत व्यवस्थापन केली.मात्र आता गेल्या चार महिन्यापासून सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडुन असल्याने समोरचा आर्थिक व्यवहार कसा करावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे. मागील दोन दिवसापासून सोयाबीनचे दर पुन्हा दोनशे रुपयांनी कमी होऊन आता थेट पाच हजार पर्यंत येऊन पोहोचल्याने सोयाबीन ठेवावा की विकावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.