पश्चिम महाराष्ट्र

घर कामासाठी दांपत्याला कामावर ठेवन पडलं महागात

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने घर कामासाठी एक दांपत्य कामाला ठेवलं होतं. मात्र, या दाम्पत्याची कुठलीही चौकशी न करणे या व्यासायिकाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण या व्यवसीयकाचे कुटुंब फिरायला बाहेर जाताच या दाम्पत्याने व्यावसायिकाच्या घरावरच डल्ला मारला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी या चोरट्या दांपत्याला नागपूर मधून अवघ्या २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत.

बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घर कामासाठी आलेल्या दांपत्यानेच घरातील रोकड आणि ५७ तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना यरवड्यातील कल्याणी नगर भागात घडली आहे. राजपाल वामन हारगे ( वय ३९ रा. कल्याणीनगर मूळ. लातूर ) उर्मिला हारगे ( वय ३८ ) असे चोरट्या दांपत्याचे नाव असून पोलिसांनी त्यांना नागपूर मधून अटक केला आहे. याबाबत कल्याणी नगर येथील एका बांधकाम व्यवसायिकानी फिर्याद दिली. फिर्यादी हे कल्याण नगर येथे वास्तव्यास आहेत.

मागील पाच ते सहा महिन्यांपासून बांधकाम व्यवसायिकाकडे हारगे दांपत्य काम करते. सोमवारी २६ तारखेला बांधकाम व्यावसायिक कुटुंबीय अलिबाग येथे फिरायला गेलो होते. या दरम्यान या दोघांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील बाथरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ५७ तोळे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तेथून पोबारा केला. येरवडा पोलिसांनी तात्काळ आरोपीचा माग काढत नागपूर येथून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड सोन्या-चांदीचे दागिने असे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेला राजपाल हारगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर लातूर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे, असं तपासात समोर आल आहे. त्यामुळे आता घर कामासाठी या दांपत्याला कामावर ठेवताना बांधकाम व्यावसायिकाने त्याचे रेकॉर्ड तपासले नव्हते, तसेच कुठलीही शहानिशा न करता त्याला कामावर ठेवले होते असे समोर आले आहे.

अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, स्वप्नाली गायकवाड, अमजद शेख, सागर जगदाळे, दत्ता शिंदे, सुरज ओंबासे, कैलास डुकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment