पश्चिम महाराष्ट्र

महिले सोबत पळून जाण्यासाठी रचला स्वतःच्याच मरणाचा कट

पुणे – पुण्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आळंदी परिसरात असणाऱ्या चऱ्होली भागात एका ६५ वर्षीय व्यक्तीने ४८ वर्षीय वयाच्या व्यक्तीचा खून करून त्याचे डोके धडापासून वेगळे करून त्याला स्वतःचे कपडे घालून घटनास्थळवरून तो पसार झाला. वरून आळंदी येथील च-होली खुर्द या गावामध्ये एखाद्या सिनेमाला कथा शोभावी असा प्रकार समोर आला आहे. महिलेशी असणाऱ्या प्रेम संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा आरोपी फरार होण्याच्या नादात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रवींद्र भिमाजी घेनंद (वय ४८, रा. धानोरे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५, रा. च-होली खुर्द, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निखिल रवींद्र घेनंद (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री घडली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी सुभाष थोरवे याचे स्वतःचे शेत आहे. रवींद्र घेनंद आणि त्याची चांगली ओळख होती. तसेच आरोपीचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्या महीलेसोबत लांब कुठे तरी जाऊन राहायचे होते. त्यामुळे त्याने स्वतःचा मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने घेनंद यांना गोड बोलून शेतामध्ये नेले. त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करत मानेपासून डोके वेगळे करून त्यांचा खून केला. त्यानंतर, स्वतःच्या अंगावरील कपडे घेनंद यांच्या मृतदेहावर घालून त्यांना रोलरमध्ये घालून फिरवले आणि अपघाताचा तसेच स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला.

एवढंच नाही तर खून करण्यासाठी जे साहित्य वापरले ते नष्ट करून खुनाचा पुरावा देखील नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर थोरवे कुटूंबियांनी त्यांचा मृतदेह शेत्तात पाहिला तेव्हा त्याला देहाला मुंडके नव्हते मात्र कपडे थोरवे यांचेच होते. त्यावरून थोरवे कुटुंबीयांनी हा मृतदेह थोरवे यांचा असल्याचे मान्य केले. एवढेच नाही त्यांचा दहाव्याचा कार्यक्रमही त्यांनी गावात घातला. मात्र पोलिस तपासता हा आरोपी पोलिसांना दुसऱ्या गावात सापडला. तो थोरवे असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. आळंदी पोलिसांकडून संबधित आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment