क्रीडा

Tokyo Paralympics मध्ये भारताला पाचवे गोल्ड, कृष्णा नागरची सुवर्ण भरारी!

टोकयो, 5 सप्टेंबर : टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) कृष्णा नागरनं  (Krishna Nagar)  भारताला पाचवे गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. त्यानं बॅडमिंटन स्पर्धेतील एसएल 6 क्लास फायनलमध्ये हाँगकाँगच्या के चू मान केईचा 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला.

या स्पर्धेत भारताला बॅडमिंटन स्पर्धेत मिळालेलं हे चौथं मेडल आहे. कृष्णाच्या पूर्वी प्रमोद भगतनं  (Pramod Bhagat) गोल्ड, सुहास यतिराजनं (Suhas Yathiraj) सिल्व्हर तर मनोज सरकारनं (Manoj Sarkar) ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेल्या मेडलची संख्या आता 19 झाली आहे. भारतानं आत्तापर्यंत 5 गोल्ड, 8 सिल्व्हर आणि 6 ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील भारताची आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

राजस्थानमधील जयपूरचा रहिवाशी असलेल्या कृष्णानं दुबईतील पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन गोल्ड मेडल पटकावले होते. नागरनं एसएल 6 क्लाल गटात गोल्ड मेडल पटकावलंय. या गटात कमी उंचीचे खेळाडू खेळतात. कृष्णा 2 वर्षांचा होता तेव्हाच त्याची उंची वाढणार नाहीस, असं डॉक्टरनी सांगितले होते. त्याच्या घरातील अन्य सर्वांची उंची सामान्य आहे. पण त्याची उंची साडेचार फुटांपेक्षा जास्त वाढू शकली नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment