क्रीडा

Tokyo Paralympics 2020: आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण तर मनोज सरकारला कांस्य

प्रथम प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकले तर मनोज सरकारने कांस्यपदक जिंकले.

Tokyo Paralympics 2020: टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. भारताच्या प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL 3 बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. यानंतर, भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले.

जागतिक क्रमवारीतील नंबर एक असलेल्या पॅरा-शटलर प्रमोद भगतने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा पराभव केला. त्याने यापूर्वी जपानच्या डेसुके फुजीहाराविरुद्ध 21-11 आणि 21-16 असा विजय मिळवला होता जो उपांत्य फेरीत फक्त 36 मिनिटे चालला होता.

India Wins Gold: शूटिंगमध्ये मनीष नरवालनं जिंकलं सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक, भारताची पदकसंख्या 15 वर

बॅडमिंटन यावर्षी पॅरालिम्पिक स्पर्धेत डेब्यू करत आहे. जगातील नंबर वन खेळाडू भगत, अशा प्रकारे खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. भुवनेश्वरचा 33 वर्षीय खेळाडू सध्या मिश्र दुहेरी एसएल 3-एसयू 5 वर्गात कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. भगत आणि त्याचा साथीदार पलक कोहली रविवारी कांस्य पदकाच्या प्लेऑफमध्ये जपानच्या डेसुके फुजीहारा आणि अकीको सुगिनो यांच्याशी लढतील.

मनोज सरकारनं कांस्य जिंकलं
भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेतही चमत्कार केला. त्याने ब्रॉन्ज अर्थात कांस्यपदक जिंकले. मनोजने जपानच्या डेसुके फुजीहाराचा सरळ गेममध्ये 22-20 आणि 21-13 असा पराभव केला. हा सामना 47 मिनिटे चालला.

Avani Lekhara Wins Bronze : अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं, भारताचं बारावं पदक

पॅरालिम्पिकमध्ये भारताचं अजून एक पदक निश्चित
पॅरालिम्पिकमध्ये आज सकाळी दोन पदकं भारताच्या खात्यात आल्यानंतर आता आणखी एक पदक निश्चित झालं आहे.  पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागर (Krishna Nagar) फायनलमध्ये पोहोचला आहे. तो उद्या सुवर्णपदकासाठी लढणार आहे. या लढतीत तो जिंकला तर भारताला अजून एक सुवर्णपदक मिळेल. तो यात पराभूत जरी झाला तरी त्याचं रौप्यपदक निश्चित आहे. आज झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment