क्रीडा

Tokyo Paralympics 2020: भारताच्या पॅरा-क्रीडापटूंनी टोकियोमधील सर्व विक्रम मोडले! 19 पदके जिंकून रचला इतिहास

Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या शेवटच्या दिवशी भारतीय पॅरा-अॅथलीट्सनी आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली. आज भारतासाठी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत कृष्णा नागरने SH6 प्रकारात सुवर्ण आणि सुहास यथिराजने SL4 प्रकारात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. विशेष गोष्ट अशी की भारताने या पॅरालिम्पिक गेम्समधील आपली मोहीम नागरच्या सुवर्णाने संपवली आहे. भारतातील पॅरा-क्रीडापटूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी 19 पदके जिंकली, जी आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. यापूर्वी भारताने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली होती.

भारताने टोकियोमध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदके जिंकली. 19 पदकांसह भारत टोकियो पॅरालिम्पिकमधील पदक तालिकेत 24 व्या स्थानावर आहे. 54 पॅरा-अॅथलीट्सने भारतातील 9 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची ही सर्वात मोठी स्पर्धा होती.


या पॅरा-अॅथलीट्सने सुवर्णपदके जिंकली
भारतासाठी पहिले सुवर्णपदक अवनी लेखारा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत जिंकले. यानंतर सुमित अँटिलने भालाफेकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. मनीष नरवालने 50 मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकले आणि प्रमोद भगतने बॅडमिंटनमध्ये देशासाठी चौथे सुवर्णपदक जिंकले. यानंतर, शेवटच्या दिवशी, पुन्हा एकदा बॅडमिंटनमध्ये, कृष्णा नागरने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकांची सख्या 5 केली.

या पॅरा-अॅथलीट्सच्या नावे सिल्वर मेडल
रौप्य पदकाबद्दल बोलायचं झालं तर भारताला अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 5 पदके मिळाली. याशिवाय भारताने टेबल टेनिस आणि नेमबाजीमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकले. तर आज सुहास यथिराजने बॅडमिंटनमध्ये भारतासाठी पॅरालिम्पिक खेळांचे आठवे रौप्य पदक मिळवले. भारतासाठी टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, निषाद कुमार उंच उडीत आणि योगेश कठुनिया यांनी थाळी फेकमध्ये रौप्य पदक पटकावले. याशिवाय देवेंद्र झाझरिया यांनी भालाफेकमध्ये रौप्य पदके पटकावलं आणि मरिअप्पन थंगावेलू आणि प्रवीण कुमार या दोघांनी उंच उडीत रौप्य पदके जिंकली. त्याचबरोबर नेमबाजीमध्ये 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सिंहराज अडानाने देशासाठी रौप्य पदक पटकावले.

भारताला टोकियोमध्ये सहा कांस्यपदके
दुसरीकडे कांस्यपदकांबद्दल सांगायचं म्हटलं तर भारताने या खेळांमध्ये 6 कांस्यपदके जिंकली. त्यापैकी नेमबाजीमध्ये दोन पदके, अॅथलेटिक्स आणि तिरंदाजीमध्ये दोन पदके तसेच बॅडमिंटनमध्ये एक एक कांस्य पदक जिंकले. भारतासाठी सुंदरसिंह गुर्जरने भालाफेक, सिंहराज अडाना शूटींग, शरद कुमार हाय जंप, अवनी लेखारा शूटींग, हरविंदर सिंगने आर्चरी आणि मनोज सरकार यांनी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. अवनी लेखारा आणि सिंहराज अडाना यांनी या पॅरालिम्पिक खेळांमध्ये दोन पदके जिंकून दुहेरी यश मिळवले.

टोकियो पॅरालिम्पिक पदकांची आकडेवारी

देश              स्वर्ण           रजत        कांस्य      कुल पदक 
भारत             05             08            06            19

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment