कल्याण – गेल्या काही महिन्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी चैन सँचिंग, घरफोडी आणि इतर गुन्हे वाढले आहेत. यालाच आळा घालण्यासाठी पोलीसांनी अट्टल गुन्हेगाराना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास सुरवात केली आहे. तसेच विविध गुन्हे करण्याच्या गँगच्या मुसक्या आवळत त्याच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास सुरवात केली आहे. कल्याण महात्माफुले पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा उघडलीस केला त्याची माहिती देताना अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या काही महिन्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या ठिकाणी चैन सँचिंग, घरफोडी आणि इतर गुन्हे वाढले आहेत. यालाच आळा घालण्यासाठी पोलीसांनी विविध १८ गुन्ह्यातील तब्बल ७९ आरोपींवर मोक्काचे गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. यामध्ये डोंबिवली पूर्व शेलार नाका येथील वांग्या गॅंग, कल्याण मधील अभिजित कुडाळकर गॅंग, पंढरी फडके गँग तसेच इतर आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की या अनुषंगाने मी स्पष्ट करतो की जबरी चोरीचे महिलांचे मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार घडतायेत त्याबाबत पोलीस अत्यंत जागरूकतेने आणि सक्रियतेणे गुन्ह्यांचा तपास करत आहे असे गुन्हे प्रतिबंध व्हावेत आणि गुन्हाना अटकाव निर्माण व्हावा यासाठी त्या अनुषंगाने ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रिण अधिनियमची कलम आणि घटक पूर्ण होत आहेत त्या गुन्ह्यांना ही वाढीव कलम लावण्यात येत आहेत. आतापर्यंत पूर्व प्रादेशिक विभागामध्ये एकूण १८ गुन्ह्यांना मोक्का कायद्याची कलम लावण्यात आलेली आहेत. यामुळे निश्चितपणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अटकाव होईल अशी आमची भूमिका आहे आम्ही कुठल्याही संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या बाबतीत त्यांनी केलेला गुन्हा त्यांचा सातत्याने सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्य आहे ते स्पष्ट झाल्याबरोबर मुका कायदाचे कलम हवीत आहोत त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या फायरिंग च्या गुन्ह्यांमध्ये मुका कायद्याचे कलमा लावलेले आहेत. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये चैन स्याचिंगच्या गुन्ह्यांना मोक्का कायद्याची कलम लावलेली आहेत. कोळसेवाडी डोंबिवली मानपाडा अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधील एकूण १८ गुन्ह्यांना आम्ही आतापर्यंत या कायद्याची कलम लावलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडायचे आणि त्यांना या सगळ्यात प्रभावी असलेल्या या कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा आमचा मानस आहे.
अंबरनाथ मधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील सर्व ३२ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये यातील आरोपी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि केडीएमसीचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचाही समावेश आहे.