देश-विदेश

अमर जवान ज्योतीचे इंडिया गेटहून राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी हस्तांतरण

अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू – राहुल गांधी

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २१ —

नवी दिल्लीतील लुटीयन्स झोन मध्ये असलेल्या इंडिया गेट येथे तेवत ठेवली जाणारी अमर जवान ज्योत आज लष्कराने समारंभपूर्वक विझवली . ही ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात तेवत राहील . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला  . यामुळे आज त्यावर अंमलबजावणी करण्यात आली . ही ज्योत पुन्हा पेटवू असे कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज म्हटले .  

भारत आणि पाकिस्तान  यांच्यात १९७१ मध्ये युद्ध झाले . इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हे युद्ध झाले होते . यात पाकिस्तानचे तुकडे करण्यात आले . आजचा पाकिस्तान आधी पश्चिम पाकिस्तान या नावाने ओळखला जात असे . पूर्वी पाकिस्तानची ओळख आज बांगला देश या नावाने आहे .

या विजयाची आठवण म्हणून इंडिया गेट येथे अमर जवान ज्योत प्रजवलीत करण्याचा निर्णय झाला . त्यावर अंमलबजावणी देखील झाली . लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे युद्धघटन केले . त्या ठिकाणी देखील ज्योत प्रजवलीत केली जाते . आता इंडिया गेट वरील ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी हस्तांतरित केली गेली .    

कांग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार ( पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग ) असताना राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा प्रस्ताव होता . पण त्यांच्या कार्यकाळात हे झाले नाही . महाराष्ट्र सदन कोपर्निकस मार्गाच्या बाजूला हे राष्ट्रीय युद्ध स्मारक करण्याचा ( प्रिन्सेस पार्क ) सिंग सरकारचा बेत होता . पण अनेक अडचणीमुळे हे होऊ शकले नाही . इंडिया गेटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मोदी सरकारने हे राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले . त्या ठिकाणी अमर जवान ज्योत हलवण्यात आली .

लष्करच्या उपस्थितीत ज्योत हलवण्यात आली . सैन्य दलाचे तिन्ही जवान अमर जवान ज्योत येथे पहारा देत ज्योत तेवत ठेवण्याचे कर्तव्य पार पाडत होते .     काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत . काही हरकत नाही —

आम्ही आमच्या सैनिकांकरता अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू असे राहुल गांधी यांनी म्हटले . त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली .      

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या १९७१ च्या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमर जवान ज्योत इंडिया गेट येथे  स्थापित करण्यात आली . पहिल्या जागतिक महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांची आठवण म्हणून इंडिया गेट बनवण्यात आले . इंडिया गेट येथे अमर जवान ज्योत बांधण्यात आली . याचे उदघाटन त्यावेळी इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७१ रोजी  केले .

राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेट पासून सामान्यपणे ४०० मीटर अंतरावर आहे . या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी केले . इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या मध्ये एका गोल चक्कर मध्ये एक चबुतरा आहे .

तेथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे . या बरोबरच आता प्रजासत्ताक दिनाची सुरुवात २३ जानेवारी पासून होणार आहे असा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अन्य मान्यवर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी इंडिया गेटवर जाऊन अमर जवान ज्योत येथे पुष्प चक्र वाहवून श्रद्धांजली अर्पण करत असतात  . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment