मुंबई

विजेच्या धक्क्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

कल्याण – लाकूड तोडण्यासाठी मलंगगड येथील म्हात्रे गोट फार्म मधील आदिवासी महिला गेली असता विजेच्या धक्क्याने तिचा जागिच मृत्यु झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत महिलेचा मृतदेह हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे.

मलंगगडच्या म्हात्रे गोट फार्म मध्ये काम करणाऱ्या एका महिलेला शनिवारी सायंकाळी विजेचा धक्का लागला आणि तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मलंगगडच्या म्हात्रे गोट फार्म परिसरात असलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी ही महिला झाडावर चढली होती. मात्र झाडाच्या फांदीचा महावितरणच्या विजेच्या तारांशी संपर्क झाल्याने मंदा मुकणे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बाळू वाघे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. मूळचे भिवंडी मधील राहणारे असलेले हे दोघे मलंगगड येथील म्हात्रे गोट फार्म मध्ये कामासाठी होते. मात्र अचानक विजेचा धक्का लागल्याने मंदा मुकणे या महिलेला आपले जीव गमवावा लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच महावितरण करून कल्याण पूर्वेतील मलंगगड भागाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तर हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास हिललाइन पोलीस करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment