चंद्रपूर – बल्लारपूर रेल्वे स्थानकांत दोन महिण्याच्या नवजात बालकाची तस्करी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बल्लारपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. बालकाची १० हजार ५०० रूपयांमध्ये विजयवाडा येथे विक्री करणार होते. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चंद्रकांत मोहन पटेल (४०) मुंबई, दौपदी राजा मेश्राम, (४०) नागपूर ,असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
२५ डिसेंबरला १२६५५ या क्रमांकाच्या नवजीवन एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक ५ व ६ मध्ये एक दाम्पत्य नवजात बालकाला सोबत घेत प्रवास करीत होते. तेलंगणातील विजयवाडा येथे जात होते. त्यांच्यासोबत असलेले २ महिन्याचे नवजात बालक हे सतत रडत असल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करीत मोबाईल तपासून पाहिला असता, त्यामध्ये मुलाला विजयवाडा येथे विक्री करणार असल्याचे नमदू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांनीही नवजात बाळाला विक्री करणार असल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपी हे १० हजार ५०० रूपयांना नवजता बाळाची विक्री ही विजयवाडा येथील युनूस व मुमताज यांच्याकडे करणार होते. ही कारवाई रेल्वे पोलीस मानव तस्करी विभागाचे प्रवीण महाजन, संजय शर्मा, सिंह, रेल्वे पोलीस राठोड यांच्या पथकाने केली आहे. एका नवजात बालकांची तस्करी करून विक्री करण्यासाठी नेत असल्याची तक्रार नागपूर रेल्वे पोलिसांना मिळाली. नागपूर रेल्वे पोलिसांनी बल्लारपूर रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.