कोंकण महाराष्ट्र

एकवीस वर्षीय तरुण बेपत्ता समुद्रात मिळाला मृतदेह

रत्नागिरी – रत्नागिरी येथील कृष्णा बोटीवरून बेपत्ता झालेल्या खराशाचा मृतदेह मिरकरवाडा येथे सापडला आहे. हा मृतदेह १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा.सुमारास मिळाला आहेत. कृष्णा ओमप्रकाश डंगौरा (२१, रा. मुळ रा. नैपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे.  शुक्रवारी १६डिसेंबर रोजी हा मृत खलाशी बोटीवरुन बेपत्ता झाला होता. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात देण्यात आली होती.                                                                                                                                                                                      

या सगळ्या प्रकरणी इस्माईल अब्दुल रउफ साखरकर (३५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानूसार, कृष्णा डंगौरा हा जबीन रउफ सारखरकर यांच्या मालकीच्या सुहान सोफियान नावाच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. कृष्णाला दारुचेही व्यसनही होते. दरम्यान रविवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास मिरकरवाडा समुद्राच्या पाण्यात कृष्णा डंगौराचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. तो बोटीवरुन प्रातःविधीसाठी जात असताना त्याचा तोल जाऊन पाण्यात पडुन त्याचा बुडून मृत्यू झाला असावा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल पालांडे करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment