पश्चिम महाराष्ट्र

खात्यात जमा झाले दोन कोटी…पठ्याने पुढे काय केलं ते बघा !

सातारा – महिन्याच्या शेवटी किंवा काही ठिकाणी सुरुवातीला येणारा सॅलरीचा मेसेज खुप आनंद देऊन जातो.मात्र एका पठ्ठ्याला इतकी जास्त सॅलरी मिळाली की, तो नोकरी सोडुन गायबच झाला.हो हे खरंय..ही घटना सातारा येथे घडली. येथे एका कंपनीने चुकून आपल्या कर्मचाऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये २ कोटी रुपये ट्रान्सफर केलं. मुळात त्या कर्मचाऱ्याला पगार २०,००० रुपये होता.मात्र चुकून त्याला २ कोटी रुपये ट्रान्सफर झाले.हे प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील प्रसिद्ध एका केमिस्ट कंपनीमध्ये हा पठ्ठ्या काम करीत होता.त्याला महिन्याची २० हजार रुपये पगार होता.मात्र कंपनीकडुन मोठी चूक झाली आणि या कर्मचाऱ्याला त्याच्या सॅलरीच्या कित्येक पट म्हणजे २ कोटी रुपये पैसे ट्रान्सफर केलं.ज्यानंतर कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट गायब झाला.

यानंतर कंपनीचं त्याच्यासोबत बोलणं झालेलं नाही.बँकेकडूनही काही सुचना आलेली नाही. 2 डिसेंबरला तो आपल्या वकिलासोबत आला आणि राजीनामा देऊ निघुन गेला. आता त्याच्याशी काहीच संपर्क होत नाही.त्यामुळे कंपनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं कंपनीकडुन सांगण्यात येत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment