नवी मुंबई -आपण सर्वांनीच अनेकदा मानवी विवाह झालेले पाहिले आहेत आणि आपण त्या विवाहांमध्ये सहभागी देखील झालो आहोत पण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच दोन श्वानांचा विवाह पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे लग्नात मंगलाष्टका आणि आंतरपाट धरण्याला विशेष महत्त्व असते, अगदी तशाच प्रकारचा विधी श्वानांच्या लग्नातही झाल्याने या विवाहाची संपूर्ण नवी मुंबईमध्ये चर्चा होत आहे.
विवाह बंधनात दोन व्यक्ती अडकणे ही सामान्य गोष्ट आहे, मात्र दोन श्वानांचा विवाह झाला असं कधीही ऐकण्यात आलं नव्हतं मात्र नवी मुंबईतील सानपाडा विभागामध्ये दोन श्वानांचा विधीवत विवाह संपन्न झाल्याची घटना समोर आली आहे. आणि ह्या दोन श्वानांचा विवाहाच विषय गमतीशीर आणि चर्चेचा ठरत आहे. नवी मुंबईतील सानपाडा विभागातील गुणेंना सोसायटी मध्ये दोन श्वानांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. रिओ आणि रिया अशी ह्या दोन श्वानांची नावे आहेत. दोन सर्वसामान्य व्यक्तींचा विवाह जसा परंपरा आणि प्रथेनुसार संपन्न होतो, तशाच प्रकारे हा विवाह संपन्न झाल्यानंतर ह्या श्वानांची वरात देखील काढण्यात आली. त्यामुळे ह्या दोन श्वानांचा विषय चर्चेत आला असून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच ह्या विवाहाला वऱ्हाडासह पाहुण्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.
लग्नामध्ये जसे मंगलअष्टका, अंतरपाटा सह इतर पद्धतींना महत्त्व असते , तसेच विधी या श्वानांच्या लग्नातही झाले आहे. त्यामुळे ह्या लग्नाचा व्हिडीओ सद्या सर्वत्र व्हायरल झाला असून पसंती मिळत आहे. दोन श्वानांची लग्न हे सामान्य नव्हते त्यांची मिरवणूक ही मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. आणि मंडपही सजवण्यात आले होते. जेथे पंडितांच्या उपस्थितीत सात फेरे घेऊन आणि एकमेकांना पुष्पहार घालून दोन श्वानांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. दोन्ही श्वानांच्या बाजूची नातेवाईक मंडळी लग्नाचा आनंदा घेत होती. दोन श्वानांचा विवाह संपन्न झालेले हे लग्न नवी मुंबईतील पहिलेच लग्न असेल. या लग्नाला युवा नेते निशांत भगत उपस्थिती होते, यावेळी त्यांनी सांगितले की हा विवाह अनोखा नसून समाजासाठी जनजागृतीचा एक भाग असल्याचे सांगितले.