पश्चिम महाराष्ट्र

मांजामुळे दोन दुचाकीस्वार पोलीस जखमी

पुणे- सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार दोन पोलिस जखमी झाल्याची घटना घडली. पोलिस कर्मचारी महेश पवार, सुनील गवळी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पवार आणि गवळी दोघे शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात नियुक्तीस असल्याचे समजते. रविवारी दुचाकीस्वार पवार आणि गवळी पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावरून निघाले होते. त्या वेळी मांजा मानेला अडकल्याने पवार यांच्या गळ्याला दुखापत झाली.

त्यांच्याबरोबर असलेले सहकारी गवळी यांचा हात मांजामुळे चिरला, अशी माहिती हेल्प रायडर्स संस्थेचे स्वयंसेवक, पक्षीमित्र बाळासाहेब ढमाले यांनी दिली. ढमाले शंकर महाराज उड्डाणपुलावरून दुचाकीवरून निघाले होते. त्यांनी हा प्रकार पाहिला मांजामुळे पक्षी जखमी
संक्रांतीला पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यात आल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात घार, कावळा, कबूतर, पारवा या पक्ष्यांना दुखापत झाली. पक्षिमित्र बाळासाहेब ढमाले यांनी रविवारी (१५ जानेवारी) कोथरूडमधील सर्वत्र सोसायटी, बुधवार पेठ, तसेच कसबा पेठेत मांजात अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. मांजामुळे घारींच्या पंखांना दुखापत झाली. ढमाले यांनी घारींची सुटका करून कात्रज येथील प्राणी, पक्ष्यांच्या अनाथालयात उपचारासाठी दाखल केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment