पिंपरी – काही दिवसांपूर्वी पिंपरीतील काळेवाडी परिसरातून एका वकिलाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे समोर आले होते. मारेकऱ्यांनी वकील शिवशंकर शिंदे यांना त्यांच्या कार्यालयात मारहाण केली, त्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांचे हातपाय बांधून त्यांना ड्रममध्ये भरून त्यांना तेलंगणा बॉर्डरवर त्याला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याचा खून झाला. या प्रकरणी आरोपींना देगलुर तालुक्यातील भक्तापुर येथून दोन आरोपींना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात राजेश्वर गणपतराव जाधव (वय ४२, ह.मु. कोळेवाडी पुणे) या आरोपीस ताब्यात घेतले. बालाजी मारुती आयनलवार (वय २४ ) आणि सतीश माणिकराव इंगळे (वय २७) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वकील असलेले शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचे पुणे येथे काळेवाडी येथे कार्यालयात आहे. महिलेशी असलेल्या संशयावरून महिलेच्या पतीने ३१ डिसेंबर रोजी रात्री आरोपींनी शिंदे यांचे कार्यालय गाठले. त्यावेळी शिंदे यांची त्यांच्यासोबत झटापट झाली. आरोपींनी शिंदे यांना मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधले. त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी बांधून एम.एच.१४/ए ८११६ या क्रमांकाच्या टेम्पोत टाकून देगलूरकडे आणले. तसेच शिवशंकर शिंदे यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. तसेच मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेला आढळून आला होता. या प्रकरणात तिन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.