रत्नागिरी – शहराजवळ शिरगाव येथे झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे आता समोर आली आहेत. १) कणीझ अशफाक काझी २) नुरनीसा अमीर अलझी या दुर्दैवी घटनेच्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अम्मा अशफाक काझी, अशफाक काझी हे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की रत्नागिरी शहरात या स्फोटा आवाज ऐकू आले आहेत. याच स्फोटात समोरच्या इमारतीमधील खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत.
दरम्यान या भीषण अशा झालेल्या स्फोटाची दखल घेण्यात आली असून शास्त्रीय चौकशी सुरू झाली आहे. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेत दोन महिलांचा जीव गेला आहे त्यामुळे घटना भीषण आहे. या आगीत रिक्षाचालक असलेले अश्फाक काझी यांच्या पत्नीचा व सासूचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दोन मोठे स्फोट झाले दोन मोठे आवाज झाले अशी माहिती दिली आहे. त्यामुळे दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. आजूबाजूच्या घराच्या भिंतीला तडे गेले याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे तर या घरात अश्फाक काझी यांच्या घराचे मोठे नुकसान झालं आहे
कोकणनगर येथील शेट्ये नगर येथे राहणारे अश्फाफ अहमद काझी वय वर्षे ५२ हे आपली पत्नी आई व मुलांसह रहात आहेत. ते ज्या घरात रहात होते ती एक बैठी चाळ असून घर एकमेकांना चिकटून आहेत. पण स्फोट झाला तेव्हा रस्त्याच्या पलीकडे ही घरांना तडे गेले व काचा फुटल्या आहेत. दरम्यान जखमी अश्फाक काझी व त्याचा मुलगा अमार अश्फाक काझी वय वर्षे २० हे जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान स्फोटाची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डी वाय एस पी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, ,रत्नागिरी नगर परिषदेची जितू विचारे त्यांची टीम त्याचप्रमाणे एमआयडीसीचे कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून घटनास्थळी कार्यरत आहेत.
या स्फोटाचा आवाज आल्यावर बचाव कार्यासाठी शिरगावचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी,आतिक संगमेश्वरी,रिजवान मुजावर,राहील मुजावर,आसिफ अकबाणी,अश्फाक मुजावर,आजीम चिकटे,साहिल पठाण,नुषी काझी याच्या सह शेकडो लोकांनी आवाज आल्यावर घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्यासाठी अनेकजण धावले. दरम्यान सिलेंडर च्या स्फोटाने स्लॅब कोसळू शकतो का याबाबत शास्त्रीय माहिती घेतली जात आहे.