रत्नागिरी – जिल्हयात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. दापोली खेड मार्गावर झालेल्या अपघातात भरणे मधील युवकाच्या मृत्यू झाला आहे. याप्रकरणी प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात खेड भरणे घडशी वाडी येथील वैभव आत्माराम शिगवण वय २६ याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
खेड दापोली मार्गवरील सुकदर फाटा नजीक ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत भरणे घडशी वाडी मधील २६ वर्षीय तरुण वैभव आत्माराम शिगवण याच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती खेड पोलिसांनी आज बुधवारि सायंकाळी दिली आहे.
नारायण चंदू वाडकर ४८, रा बोरगाव खुर्द, ता वाई जि. सातारा असे त्या गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या प्रकरणी शुभम संतोष दिवेकर २६ रा भोस्ते विराची वाडी यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यातील तक्रार देणार शुभम दिवेकर हा आपल्या ताब्यातील यामाहा दुचाकी एफ झेड गाडी क्रं एम एच ०८ ०४८२ यावर वैभव शिगवण यास घेऊन दोघे मंगळवारी वाकवली येथून खेड कडे येत असताना खेड हुन दापोलीच्या च्या दिशेने जाणारा ट्रक क्रं एम एच ०४ जी एफ ८५२० यावरील चालक वाडकर याने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी वर मागे बसलेला वैभव हा ट्रकवर आदळला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात नंतर ट्रक चालकाने घटना स्थळावरून पलायन केले होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी ट्रक चालक वाडकर याच्यावर भा द वि क ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, १८४, १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान वर्षाच्या अखेरीस तालुक्यातील देवघर बंदर वाडी नजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका २६ वर्षीय तरुणाचा डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात ४ दिवसांनी नोंद करण्यात आली आहे. सूरज रमेश मोरे रा. देवघर बंदर वाडी असे त्या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ३१ डिसेंबर रोजी तो आपल्या ताब्यातील दुचाकी यामहा एफझेड एम एच ०८ ५२७५ घेऊन जात असता देवघर बंदर वाडी नजीक दुचाकी रस्त्यावरुन घसरली यात सुरज याच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.