पश्चिम महाराष्ट्र

रायगडावर आत्मक्लेष करणार – उदयनराजे भोसले

सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असून ही गंभीर बाब आहे. त्यासाठी आम्ही रायगडावर जात असून उद्या (शनिवारी) छत्रपतींच्या समाधीजवळ जाऊन आम्ही वेदना मांडून आत्मक्लेष करणार अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असतील तर हा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही. या लोकांचे मोठे उपकार व योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान होतो ही गंभीर बाब असून त्यातून आम्हाला वेदना होत आहेत. त्यामुळे आत्मक्लेष करण्यासाठी आम्ही रायगडावर निघालो आहे. त्या ठिकाणी जाऊन वेदना मांडणार आहोत’, असं उदयनराजेंनी सांगितलं.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment