कोंकण महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे गटाचा बहिष्कार

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग शासकीय आढावा बैठकीला ठाकरे गट अनुपस्थित राहणार आहे. ही आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे होणार आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीत होणार आहेत. कोकणातील एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यावर हा पहिलाच शासकीय दौरा आहे.

दरम्यान या बाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने मी दिल्ली तच आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी सांगितले की मला या बाबत कसलीही कल्पना नाही. तर शिवसेना उपनेते व आमदार राजन साळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमावर ठाकरे गटाच्या शिवसेने चे कोणीही जाणार नसल्याचे सांगितले.

तर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या कामाची उदघाटन करणार आहेत ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मंजूर झाली असल्याचे ही आमदार राजन साळवी यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी रत्नागिरी च्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणचे उद्घाटनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांची जाहीर सभाही होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमांचे निमंत्रण आमदार राजन साळवी व भास्कर जाधव यांना देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलं आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment