विदर्भ

अमरावती विभाग पदवीधरसाठी उद्या मतदान; काही वेळातच मतपेट्या मतदान केंद्रावर होणार रवाना

अमरावती – विभागात पदवीधर निवडणुक होत असून उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतदान होणार आहे, एका जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात असून यासाठी भाजपचे विद्यमान आमदार रणजीत पाटील हे तिसऱ्यांदा रिंगणात आहे तर त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचे तगडे आव्हान आहे,उद्या होणाऱ्या मतदानासाठी २ लाख ६ हजार १७७ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे,तर अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या पाच जिल्ह्यातील २६२ मतदान केंद्र असून सर्वाधिक मतदान केंद्र ७५ हे अमरावती जिल्ह्यात आहे, एकूणच उद्याच्या मतदानासाठी निवडणूक विभाग पूर्णपणे सज्ज झाला असून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून काही वेळातच मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन कर्मचारी व पोलिस रवाना होणार आहे तर सर्वांनी लोकशाहीच्या या उत्साह सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केल आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment