खान्देश

शॉक लागून आठ वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यू

धुळे -विजेच्या खांबामध्ये करंट उतरल्यामुळे जवळच खेळत असलेल्या आठ वर्षीय चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घडली आहे. धुळे शहरातील वडजाई रोड गफुनगर परिसरात या चिमुकल्या सह इतर मुलं देखील खेळत असताना या चिमुकल्याने विजेच्या खांबाला हात लावला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि यात या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद अहमद अशपाक मोमीन वय आठ वर्ष असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप लावत स्थानिकांनी व नातेवाईकांनी संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे परिसरामध्ये नेहमीच वीज वितरण विभागाच्या गलथन कारभारामुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत असल्यामुळे, यापूर्वीच बहुतांश वेळा परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयामध्ये निवेदन देऊन समस्या सोडवण्या संदर्भात मागणी केलेली असताना, वीज वितरण विभागातर्फे जाणीवपूर्वक सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते आणि वीज वितरण विभागाच्या याच दुर्लक्षितपणामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यास कारणीभूत असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी वीज वितरण विभागाला दिला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment