पुणे : ट्रेकिंग म्हटलं की गड किल्ल्यांची आठवण येते. मात्र ही ट्रेकिंग करताना अनेक धोके पत्करून ट्रेकर्स ट्रेक करण्यासाठी जातात. त्यामुळे अनेकदा त्यांना धोका पत्करावा लागतो. प्रसंगी त्यात आपले प्राण देखील गमवावे लागतात. अशी एक घटना पुण्यातल्या मुळशी आणि मावळ तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या टेलबैल गडावरून समोर आली आहे. तैलबैल गडावर ट्रेक करत असताना रोप व्ह तुटल्याने २०० फूट खाली कोसळून ट्रेकर्सचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सोमनाथ बळीराम शिंदे ( वय २५) असे मृत पावलेल्या ट्रेकर्सच्या नाव असून रविवारी ही अचानक ही घटना घडली आहे. या घटनेमुळे ट्रेकिंग करणाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ हा त्याच्या नऊ मित्रासोबत ट्रेकिंग साठी तैलबैल गडावर गेला होता. सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप वे चे दोर बांधण्याचे काम करत होता.हे करत असताना त्याचे मित्र बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गडाची चढाई करत होते. चढाई करत असताना अचानक बांधलेली दोरी तुटली.त्यामुळे सोमनाथ ला सावरायला वेळ मिळाला नाही. तो दोरी तुटून खाली २०० फूट दरीत कोसळला.
या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी त्याचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला. त्यामुळे ते पुरते घाबरून गेले होते. सोमनाथ हा पुण्यातील कात्रज परिसरात राहणार होता. त्याला पहिल्यापासून ट्रेकिंगची आवड होती. सोमनाथ याचा मृत्यू अचानक दोर तुटल्याने झाला. त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.