ठाणे – ठाण्याच्या कामगार हॉस्पिटल परिसरात पडीक पाण्याच्या टाकीत एका अज्ञात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कशा, वागळे इस्टेट पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार रुग्णालय परिसरात असलेल्या पडीक पाण्याच्या टाकीत एक पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या परिस्थीत आढळून आला. या घटनेची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांना प्राप्त झाली. घटनेची मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोकमान्य प्रभाग समिती सहा- आयुक्त, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वागळे इस्टेट पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्यासह आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, मल:निसरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जावं उपस्थित झाले असल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.
कामगार रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेली पडीक पाण्याची टाकी ही ५० फूट लांब व १५ ते १८ फूट खोल आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल तसेच मल:निसरण विभागाचे कर्मचारी यांनी पडीक पाण्याच्या टाकीतील मृतदेह काढण्यासाठी प्रथम एक सक्शन पंप लावून पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सूमारास सादर पडीक पाण्याच्या टाकीतून मृतदेह आणि त्याचे अवशेष हे बाहेर काढीत वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सादर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. सदरचा मृतदेह हा हत्या करून फेकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रथम वागळे पोलीस मात्र मृतकाचे ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुढील तपास वागळे इस्टेट पोलीस करीत आहेत.