अमरावती – 2022 या सरत्या वर्षाला निरोप देत अमरावती जिल्ह्यात 2023 चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी यशस्वी बंदोबस्त ठेवत मध्यरात्री केक कापून नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मागील अनेक दिवसांपासून या नात्याकारणाने सतत तेवर चर्चेत असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात त नववर्षाच्या पूर्वस्येला पोलीस विभागाच्या वतीने कडेकोठ करून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठीक ठिकाणी चेकिंग पॉईंट ड्रंक अँड ड्राईव्ह टेस्टिंग पॉईंट उभारण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांना सामाजिक संघटनेच्या वतीने चहाचे वितरण करण्यात आले. तर मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत उत्साहात सहभागी होत केक कापत नवीन वर्षाचे स्वागत केले.