अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका; शेतकरी चिंतातूर, पिकांचे नुकसान; पंचनामे होणार काय? विदर्भात हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपिटीनंही तडाखा दिला. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पिकांचे नुकसान झाले. आता पंचनामे होणार काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तसेच पावसामुळं हवेत गारठा निर्माण झाला. यामुळं पिकांचं नुकसान होत आहे.