विदर्भ

शिक्षिकेची बदली रोखण्यासाठी उर्दू शाळेतील विद्यार्थिनी रडल्या ढसाढसा

अमरावती – सध्याची शिक्षण प्रणाली व त्यात माध्यमांचा वाढलेला उपयोग यात गुरु शिष्याचे नाते हे दुरावत चालल्याचं आपण अनेकदा ऐकून आहोत मात्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील एका उर्दू शाळेतील शिक्षिकेची बदली दुसऱ्या ठिकाणी झाल्याचे करतात विद्यार्थ्यांनी ढसाढसा रडत त्यांची बदली रद्द करा अशी मागणी केली आहे.

अमरावती जिल्हातील अचलपूर येथील नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षिका रक्षंदा नाहीद यांची बदली करण्यात आली या शिक्षिका आम्हाला चांगले शिकवत असून त्यांनी आम्हाला शिक्षणासोबतच मूल्य शिक्षण देत आम्हाला समजून घेत चांगले धडे दिले आहे असं म्हणत उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी एकच त्रागा केला. विद्यार्थिनी येथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी शाळेतील अधिकाऱ्यांकडे ही बदली थांबवण्याची मागणी केली आणि पालकांना घेऊन थेट नगरपालिकेच्या प्रशासक उपजिल्हाधिकारी संदीप कुमार अपार यांना गाठले आणि ही बदली रद्द करण्याची मागणी केली. यासाठी या विद्यार्थिनींनी गाळलेले अश्रू समाज माध्यमांवर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment