महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर विकास कामांवरील स्थगिती उठवा-आ. वैभव नाईक

महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर केलेल्या परंतु सध्याच्या राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या विकास कामांवरील स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची भेट घेऊन केली. जनतेच्या हिताच्या दृष्टीने सदर विकास कामे मंजूर करण्यात आलेली असून ही कामे लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे असल्याचे आ.वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. आ.वैभव नाईक यांच्या या मागणीवर मनुकुमार श्रीवास्तव यांनी सकारात्मकता दर्शविली. याप्रसंगी आमदार भास्कर जाधव,आमदार उदय राजपूत उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment