खान्देश

सुषमा अंधारे यांच्या पक्षाला मतदान न करण्याची वारकरी सेवा मंडळाने घेतली शपथ

खान्देश – वारकरी सेवा मंडळ, धुळेतर्फे वै.ह.भ.प.विठ्ठलबाबा चौधरी (मोठे बाबा) यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित हरिनाम संकिर्तन सप्ताह व पुरस्कार प्रदान सोहळ्यात ५४ जणांना ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांच्या हस्ते काल धुळे शहरातील नकाणे रोडवरील एकविरा नगरात आयोजित कार्यक्रमात खान्देश वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने हिंदू देव देवतासह संतांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या पक्षाला मतदान न करण्याचा ठराव करण्यात आला. खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने देवघरात खानदेश वारकरी रत्न आणि खानदेश भूषण पुरस्कार वारकरी पुरस्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आलं होतं, याप्रसंगी सुषमा अंधारे यांचा निषेध करत खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक हिरामण गवळी यांनी त्यांच्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ देखील यावेळी देण्यात आली. यावेळी सर्व वारकऱ्यांनी मंडळींनी एकमताने सुषमा अंधारे ज्या पक्षात आहेत तो पक्ष म्हणजे शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाला मतदान न करण्याचा ठराव देखील एक मताने मंजूर करण्यात आला. यावेळी धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप कर्पे, माजी नगरसेवक हिरामण गवळी यांच्या उपस्थिती खानदेशातील ज्येष्ठ वारकरी मंडळींना पुरस्काराचे वाटप करण्यात आले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment