नांदगाव पेठ – खंडोबा व बानूचा विवाह विधिवत शेकडो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. प्रारंभ झालेल्या उत्सवाला शेकडो भाविक भक्त उपस्थित होते तर राज्यातील व राज्यबाहेरील सुद्धा भाविक येथे दाखल होते. इसवी सण १७१५ साली लक्ष्मण बाबा यांनी जळका येथे सुरु केली तेव्हापासून आजपर्यंत विदर्भातील एकमेव खंडोबाची यात्रा व विवाह सोहळ्याची परंपराआजही कायम आहे. पाच जानेवारी पासून प्रारंभ झालेल्या सोहळ्याचा समारोप नऊ जानेवारीला होणार आहे. विवाहाचे विविध सोपस्कार पूर्ण करीत हा सोहळा संपन्न झाला. तर जेजुरीच्या धरतीवर जळका शहापूर येथे खंडोबाच्या विवाह सोहळ्याला व यात्रेला भाविकांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमात भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक अंबादास इंगळे, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सपकाळ, संतोष गहरवार, सुमित वानखडे,विनोद खेळकर, नितीन पाथरे, अनिकेत मंडळकर, सुनील इंगळे, अंगत इंगोले, सागर काळमेघ ,यांनी केले आहे.