विदर्भ

विदर्भात पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरण

अमरावती-पश्चिम विदर्भासह अमरावती जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे यास पार्श्वभूमीवर पुढील काही तासात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती आज सकाळच्या सुमारास अमरावती शहरासह आजूबाजूच्या परिसरात पावसाच्या हलक्या सरी भरल्या बरसल्या.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चक्रिवादळ विरले आहे. परंतु उत्तर केरळ तामिळनाडू वर हवेच्या मधल्या स्तरात चक्राकार वारे कायम असुन ते पश्चिमेकडे सरकत केरळ कर्णाटक कीणारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्राच्या रूपात अवतीर्ण होण्याची शक्यता आहे. (१३डिसेंबर) व त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र भारतीय भूभागापासून दुर जाईल. याच्या प्रभावामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. यवतमाळ वर्धा नागपूर सह पुर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

आज अकोला अमरावती बुलढाणा वाशीम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती त्यानुसार आज सकाळी पश्चिम विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. १३ ते १५ डिसेंबरः विदर्भात कोरडे वातावरण राहणार असुन
पुढील पाच दिवस किमान तापमानात २-३℃ ने वाढ होणार असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा अनिल बंडयांनी दिली.

सध्या शेतीमध्ये संत्रा तोळीचा हंगाम सुरू असून वांगी पालक फुलगोबी पत्ता गोबी या पालेभाज्या कापणी वर आले आहेत अशातच काही भागात हरभऱ्याची लागवड सुद्धा सुरू झाली आहे तर काही शेतकऱ्यांची तूर फुलोरा कडून भरलेले शेंगेच्या दिशेने जात आहे अशातच हवामान खात्याने दिलेला हा तुरळक पावसाचा अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे या पावसामुळे तुरीचे मोठे प्रमाणात नुकसान होऊ शकते विशेष म्हणजे या वातावरणाने तुरीवर अळी पडण्याची शक्यता आहे त्यासोबतच येणारा पाऊस हा कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment